ग्रामपंचायत: गालापूर, तालुका – जिल्हा: जळगाव

Grampanchayat: Galapur,
Taluka – District: Jalgaon

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येणार आहे.

 

– मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा हेतू –

• विकासाच्या योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी
• योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे
• लोकांचे जीवनमान उंचावणे
• नागरीकांना सुलभ रीतीने सेवा पुरविणे
• आरोग्य, शिक्षण,उपजीविका, सामाजिक न्याय यामध्ये काम करणे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान (२०२५-२६)
(ग्रामविकास विभाग- शासन निर्णय- दिनांक ६ ऑगस्ट २०२५ )

पार्श्वभूमी:-राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” या महत्वाकांक्षी अभियानाच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे, त्यांना स्पर्धात्मक वातावरणातून नवीन उर्जा देणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढविणे, यासाठी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” राबविण्यात येणार आहे.

मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियानाचा हेतू-
* कार्यक्रमाचेनाव: – मुख्यमंत्रीसमृद्धपंचायतराजअभियान (सन२०२५-२६)
* विकासाच्या योजनांची प्रभावी व जलदगतीने अंमलबजावणी
* योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे
* लोकांचे जीवनमान उंचावणे
* नागरीकांना सुलभ रीतीने सेवा पुरविणे
* आरोग्य, शिक्षण,उपजीविका, सामाजिक न्याय यामध्ये काम करणे

अभियानाचा कालावधी- दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. ३१ डिसेंबर २०२५

अभियानाचे प्रमुख ७ घटक-

१. सुशासनयुक्त पंचायत (लोकाभिमुख प्रशासन)- समाविष्ट महत्वाचे घटक:

* नागरीकांना ग्रामपंचायतीच्या आपले सरकार सेवा केंद्रामधून शासनाच्या २७ विभागांच्या५ ५९२ सेवा ऑनलाईन उपलब्धर करुन देणे.
* नागरीकांच्याई सर्व तक्रारी निकाली काढणे.
* ग्रामपंचायतीची वेबसाईट तयार करुन त्यािवर सर्व माहिती प्रसिध्द् करणे.
* गावात सीसीटीव्हीे बसविणे.
* गावातील पात्र लाभार्थ्यांीना आयुषमान भारत कार्ड उपलब्धर करुन देणे.
* गावातील पात्र दिव्यां्गांना ओळखपत्र मिळवून देणे.

 

२. सक्षम पंचायत (स्वनिधी, CSR, लोकवर्गणी)- समाविष्ट महत्वाचे घटक:

* ग्रामपंचायतींची घरपट्टी व पाणीपट्टी ८० टक्यांया पेक्षा जास्तच वसूल करणे.
* हजार लोकसंख्येतमागे रुपये २ लाख लोकवर्गणी गोळा करुन त्याकमधून लोकोपयोगी कामे करणे.
* ग्रामपंचायतीचे स्वयतःचे उत्पीन्नल वाढविण्याकसाठी विविध उपाययोजना हाती घेणे.


३. जलसमृद्ध, स्वच्छवहरितगाव – समाविष्ट महत्वाचे घटक:

* गावातील सर्व घरांना नळाद्वारे शुध्दग पाणी पुरवठा करणे.
* सौर उर्जेचा वापर करुन वीज देयके शून्या्वर आणणे.
* पाण्या्च्यार स्त्रो तांचे बळकटीकरण करणे.
* अपारंपारीक उर्जेचा वापर वाढविणे.
* वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन करणे.
* गावातील घनकच-याचे व सांडपाण्या चे योग्य व्य वस्था पन करणे.
* बंदी असलेल्याव प्लासस्टिकचा वापर पूर्णतः बंद करणे.

४. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण- समाविष्ट महत्वाचे घटक:

* रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणे.
* या योजनेतून माती व जलसंधारण, घनकचरा व्यावस्थाापन, जनावरांचा गोठा, कुक्कु टपालन शेड, बायोगॅस, शेळीपालन शेड,कांदाचाळ इ. कामे हाती घेणे.
* घरकुल बांधकामात या योजनेतून रु. २८,०००/- चे योगदान घेणे.

५. गावपातळीवरील संस्थासक्षमीकरण – समाविष्ट महत्वाचे घटक:

* ग्रामपंचायत कार्यालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध् करुन घेणे.
* गावांतील शाळा व अंगणवाड्यांचा दर्जा उंचावणे.
* गावांत जास्ती त जास्त सौर उर्जेचा वापर करणे.
* गावातील स्मतशानभूमी विकास करणे.
* गावात क्रीडांगण व व्याायामशाळा उपलब्ध. करुन देणे.

 

६. उपजीविका विकास व सामाजिक न्याय- समाविष्ट महत्वाचे घटक:

* मंजूर घरकुलांचे काम पूर्ण करुन घेणे.
* गावातील बचत गटांचा विकासात सक्रीय सहभाग घेणे.
* बचत गटांतील जास्ती त जास्त महिलांना लखपती दिदी करणे.
* गावातील युवकांना कौशल्य विषयक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वनयंरोजगाराच्याघ संधी देणे.
* गावात शेती गट स्थानपन करुन त्यांिची उत्पाेदकता वाढविणे.

 

७. लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ- समाविष्ट महत्वाचे घटक:

* लोकसहभाग व श्रमदानातून चळवळ उभी करणे.
* आठवडयातून किमान एक दिवस श्रमदान करणे.
* गावातील रस्तेक दुरुस्तन करुन दळणवळणाला

मूल्यमापनप्रक्रिया:

  • ग्रामपंचायती ने स्वयंमूल्याकन – पंचायत समिती कडे सादर (दि. १०जानेवारी२०२६)
  • तालुकास्तरीयसमिती- (दि. ११ जानेवारी-२६जानेवारी२०२६)
  • जिल्हास्तरीयसमिती- (दि. २८जानेवारी-१५फेब्रुवारी२०२६)
  • विभागीयसमिती- (दि. १७फेब्रुवारी-२७फेब्रुवारी२०२६)
  • राज्यस्तरीयसमिती- (मार्च२०२६)
  • पुरस्कारवितरण- (मे२०२६)

    पारितोषिके:

  • स्तर प्रथम द्वितीय तृतीय
  • तालुकास्तर १५ लक्ष १२ लक्ष ८ लक्ष
  • जिल्हास्तर ५० लक्ष ३० लक्ष २० लक्ष
  • विभागीय स्तर १ कोटी ८० लक्ष ६० लक्ष
  • राज्यस्तर ५ कोटी ३ कोटी २ कोटी

 

पत्रकारांना पुरस्कार-
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत जनजागृती/अभियानामध्ये लोकसहभाग वाढवण्याकरिता जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणे या कार्यक्रमाची जनतेस माहिती करून देणे अंमलबजावणीचे समीक्षण करणे इत्यादी बाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागातील एका ग्रामीण पत्रकारास राज्यस्तरावर पुरस्कार देवून गौरविण्यात येईल.

लाभार्थी:
योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे

फायदे:
लोकांचे जीवनमान उंचावणे

संपर्क व सूचनासाठी

प्रश्न आहेत? सूचना द्यायच्या आहेत? मदतीची गरज आहे? आमचे गाव कार्यालय तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.

संपर्क माहिती

ग्रामपंचायत कार्यालय

तालुका -  , जिल्हा -जळगाव ,  - महाराष्ट्र - .

फोन: +91 99999 99999

कार्यालयीन वेळा

सप्ताहाचे दिवस ०९:३० – ०५:३०

शनिवार ०९:३० – ०१:००

रविवार: बंद